हिटलरशाही सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळेच हरवू शकतात- छगन भुजबळ

महाड: राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप विरोधात रणशिंग फुंकले असून महाड येथे चवदार तळ्याचे घेऊन आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवर्तण यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा आरंभ झाला.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाल “ज्या महापुरुषांनी राज्यक्रांती केली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून परिवर्तनाची सुरुवात आम्ही केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावर स्वराज्याची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इथे मनुस्मृती दहन करून क्रांतीची सुरुवात केली. तिथूनच आज परिवर्तनाची सुरूवात करूया, असे प्रतिपादन जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले. भाजपच्या या हिटलरशाही सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळेच हरवू शकतात असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)