हिज्बुल मुजाहिद्दीनच्या हस्तकाला दिल्लीत अटक 

नवी दिल्ली – हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या एका संशयिताला आज दिल्लीत सुरक्षा दलांनी अटक केली आहे. तो दहशतवादी संघटनेचा हस्तक असून सुरक्षा दलांनी त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जम्मू-काश्‍मीरमधील पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग होता, अशी माहिती संबंधित अधिका-यांनी दिली आहे.

इम्तियाज मीर यांच्या हत्येप्रकरणी सुरक्षा दलांनी त्याला अटक केली आहे. या अटकेमुळे सुरक्षा दलांना मोठे यश मिळाल्याचे सांगितले जाते. सुरक्षा दलांनी संबंधित हस्तकाला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेच्या ताब्यात दिले आहे. या कारवाईबाबत दिल्ली पोलिसांकडून अद्याप सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.

-Ads-

दरम्यान, जम्मू-काश्‍मीर पोलीस दलाचे उपनिरीक्षक इम्तियाज अहमद मीर यांची ऑक्‍टोबरमध्ये दहशतवाद्यांनी हत्या केली होती. मीर हे जम्मू-काश्‍मीर पोलीस दलात सीआयडी विभागात कार्यरत होते. अनेक दिवसांपासून ते आपल्या आई-वडिलांची भेट घेऊ शकले नव्हते. शेवटी पेहराव बदलून ते घरी येत होते. त्यांनी दाढी काढली होती. मात्र, तरी देखील दहशतवाद्यांनी त्यांना गाठले आणि त्यांची हत्या केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)