हिज्बुलने लावली काश्‍मिरी जनतेला धमकीची पोस्टर्स

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) – काश्‍मीरमध्ये दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिदीनने काश्‍मिरी जनतेला धमकी देणारी पोस्टर्स लावली आहेत. काश्‍मिरी जनतेवर नाराज असणाऱ्या हिज्बुल मुजाहिदीनने हलमतपोरा येये काही पोस्टर्स लावलेली दिसून आली आहेत. या पोस्टर्सवर काश्‍मिरी जनतेला धमक्‍या देणारे संदेश आहेत.

तुम्ही हे चांगले काम नाही केलेले, असा उल्लेख करून पुढे सांगण्यात आले आहे, की आम्ही तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहोत आणि तुम्ही आमच्या प्राणांचा सौदा भारतीय लष्कराशी करत आहात. तुमचा स्वाभिमान गेला कोठे? आम्ही मशिदीत नमाज पढला, भोजन केले. आता आम्हाला असे वाटू लागले आहे, की आम्ही येथे उगाच आलो. तुम्ही लोक मुस्लिम नसून काफर आहात. खबऱ्यांना आम्ही चांगला धडा शिकवणार आहोत.

ज्यांच्याबद्दल दहशतवाद्यांना संशय आहे, अशा लोकांची नावेही या पोस्टर्सवर देण्यात आलेली आहेत. त्यात लिहिले आहे, की अब्दुल रशीद परवेझ, अहमद खान, अब्दुल रशीद खान, इर्शाद अहमद खान या घातक्‍यांनी आमचा सौदा केला आहे हे आम्हाला समजले आहे. त्यांना आम्ही बरोबर धडा शिकवणार आहोत.

यात एक विचित्र गोष्ट अशी आहे, की मारले गेलेले दहशतवादी लष्कर ए तैयबाचे होते आणि धमक्‍या मात्र हिज्बुल मुजाहिदी देत आहेत. म्हणजे दहशतवादी संघटना हातात हात घालून काम करत असल्याचे आता उघड होऊ लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)