हिजबूल कमांडर समीर टायगरला मारणाऱ्या जवानाचे काश्‍मीरमधून अपहरण

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) – 23 राष्ट्रीय रायफल्सच्या एका जवानाचे काश्‍मीरमधून अपहरण करण्यात आले आहे. काही आठवड्यांपूर्वी हिजबूल कमांडर समीर टायगरसह आणखी एका दहशतवाद्याला चकमकीत मारण्यात आले होते. ती कारवाई करणाऱ्या टीममध्ये जवान औंरगजेब होता. पूंछमध्ये राहणारा जवान औरंगजेब आज सकाळी ईद साजरी करण्यासाठी एका खासगी वाहनातून घरी जात होता.

पुलवामा जिल्ह्यात सशस्त्र दहश्‍तवाद्यांच्या एका गटाने त्याची गाडी अडवली आणि औरंगजेबला ते जबरदस्तीने घेऊन गेले. जम्मू-काश्‍मीर पोलीसांनी त्याचा तपास सुरू केला असून 23 राष्ट्रीय रायफल्सला जवान औरंगजेबच्या अपहरणाची खबर दिली आहे. हिजबूल कमांडर समीर टायगर हा ए++दर्जाचा दहशतवादी होता आणि बुरहान वानीनंतर तोच हिजबूलचा पोस्टर बॉय बनला होता. अनेक दहशतवादी हल्ल्यांच्या संदर्भात समीर वॉंटेड होता.
समीर टायगर मारला गेल्याने हिजबूलचे मोठेच नुकसान झालेले आहे.

दरम्यान बांदिपिरा येथे आज लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे, या चकमकीत एक जवान शहीद झाल्याचे सांगण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)