हिंमत असेल तर स्वत:च्या ताकदीवर लढा

 

चंद्रकांत पाटील यांचे कॉंग्रेस-राष्ट्रवादीला आव्हान : मायणीत विविध विकासकामांचे भूमिपूजन

-Ads-

वडूज, दि. 19 (प्रतिनिधी) – केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अल्पावधीत झालेली विकासकामे ही भाजपच्या जमेची बाजू आहे. त्यामुळे विरोधी कॉंग्रेस व राष्ट्रवादीची पायाखालची वाळू सरकली आहे. हिंम्मत असेल तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वत:च्या ताकदीवर निवडणूका लढवाव्यात, असे आव्हान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

मायणी, ता. खटाव येथील ब्रिटीशकालीन धरणात टेंभू योजनेच्या कामाचा शुभारंभ, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील विविध रस्त्यांच्या कामाचा तसेच पाणी योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख, ना. महादेव जानकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खा. संजय पाटील, ना. शेखर चरेगावकर, पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, उपाध्यक्ष अनिल देसाई, मनोज घोरपडे, सरपंच सचिन गुदगे, विकल्प शहा, शिवाजीराव शिंदे, मेघा पुकळे, बाळासाहेब मासाळ, बाळासाहेब खाडे उपस्थित होती.

टेंभू योजनेतून मायणीला पाणी देऊन पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आल्याचे सांगून ना. पाटील म्हणाले, राज्यातील रस्ते, पाणी आदी मूलभूत सुविधांची कामे गतीने सुरू आहेत. केंद्र व राज्य सरकार राज्याचा विकासात्मक कायापालट घडविण्यासाठी प्रयत्नशिल आहे. विरोधकांकडे विकासाचा कोणताही मुद्दा नसल्याने भाजपावर टिकाटिप्पणी केली जात आहे. त्याकडे लक्ष न देता आमचे विकासात्मक काम सुरूच राहील. दुष्काळी खटाव माणचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत.

ना. महाजन म्हणाले, सरकारने महत्वकांक्षी पावले उचलून राज्यातील शेती पाण्याची समस्या सोडविण्यासाठी गतीने कामे सुरू केली आहे. सिंचन योजना असणाऱ्या भागांतील प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पाणी पोहोचवण्यात येणार आहे.
सहकार मंत्री सुभाष देशमुख, डॉ. येळगावकर, ना. जानकर, खा. पाटील, देसाई यांचीही भाषणे झाली. सचिन गुदगे यांनी प्रास्ताविक केले. सुरज पाटील यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)