“हिंदू पाकिस्तान’ मुळे थरूर वादाच्या भोवऱ्यात

राहुल गांधी यांनी माफी मागावी – भाजपची मागणी

थिरुवनंतपुरम – कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी केलेल्या “हिंदू पाकिस्तान’ अशा शब्दप्रयोगामुळे नवीन वादाला सुरुवात झाली आहे. कॉंग्रेस पक्षानेही या शब्दप्रयोगाबद्दल थरूर यांना समज दिली असल्याचे समजते आहे. तर थरूर यांच्या या वादग्रस्त वक्‍तव्याबद्दल कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे. निवडणूकांनंतर जर भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास राज्यघटनाच नव्याने लिहीली जाईल आणि आणि त्यातून “हिंदू पाकिस्तान’च्या निर्मितीचा मार्ग निर्माण केला जाईल, असे वक्‍तव्य थरूर यांनी केले होते.

जर सध्याच्याच संख्याबळाने भाजप पुन्हा लोकसभेमध्ये भाजप निवडून आला तर लोकशाही राज्यघटना आज जशी आहे, तशी जिवंत राहणार नाही. कारण भाजपकडे राज्यघटनेची चिरफाड करून नवीन राज्यघटना लिहीण्यासाठी आवश्‍यक ते तिन्ही घटक त्यांच्याकडे असतील. त्यामागे हिंदू राष्ट्राची संकल्पना असेल. त्यामध्ये अल्पसंख्यांकांसाठीची समानता हटवली जाईल आणि “हिंदू पाकिस्तान’ची निर्मिती केली जाईल, अशी भीती थरूर यांनी काल व्यक्‍त केली. थिरुवनंतपुरममधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हे वक्‍तव्य केले. महात्मा गांधी, पंडीत नेहरू, सरदार पटेल,

मौलाना आझाद आणि स्वातंत्र्यचळवळीतील सर्व महान विभुतींनी यासाठी संघर्ष केलेला नव्हता, असेही ते म्हणाले.
दरम्यान, थरूर यांचे वक्‍तव्य हे भारतीय लोकशाही आणि हिंदूंवरील हल्ला असून त्याबद्दल कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागायला हवी, अशी मागणी भाजपच्यावतीने होऊ लागली आहे. थरूर यांचे वक्‍तव्य अतिशयोक्तीपूर्ण आणि भारतीय लोकशाही आणि हिंदूंवरील हल्ला असल्याची टीका भाजपचे प्रवक्‍ते संबित पात्रा यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आनि भाजपच्या द्वेषापायी थरूर यांनी पुन्हा एकदा लक्ष्मण रेषा ओलांडली आहे आणि भारतीय लोकशाहीचा अवमान केला आहे, असे पात्रा म्हणाले.

पुन्हा पुन्हा बोलणार…
थरूर यांनी फेसबुकवरून आपल्या वक्‍तव्याचे स्पष्टिकरण दिले आहे. भाजप आणि संघाची “हिंदुराष्ट्रा’ची संकल्पना ही पाकिस्तानचीच छोटी प्रतिमा आहे. आपण हे मत यापूर्वीही व्यक्‍त केले होते आणि यानंतरही आपण हेच बोलू. पाकिस्तानची निर्मिती धार्मिक हेकेखोरपणामुळे झाली होती. ही भावना अल्पसंख्यांकांना हीन लेखणारी आहे. हाच हिंदू पाकिस्तान असेल.

आपल्यासारख्या शेकडो हिंदूंना या समावेशकतेबाबत आनंदच वाटतो. ज्याप्रमाणे पाकिस्तानातील हिंदू असहिष्णू आणि दैवावर विसंबून राहतात, तशी स्थिती आपली होऊ नये, यासाठी ही सर्वसमावेशकता सोडण्याची आपल्याला अजिबात ईच्छा नाही. असे थरूर यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)