नवी दिल्ली – फ्रेंच कंपनी दासॉल्ट एव्हिएशनच्या सहकार्याने राफेल विमानांची निर्मिती करण्यास “हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लिमिटेड’ ही सरकारी कंपनी सक्षम न ठरल्यानेच “युपीए’ सरकारला या कंपनीकडून 126 राफेल विमाने खरेदी करता आली नव्हती, असे संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटले आहे.

या विमानांच्या खरेदीचा दर निश्‍चित करण्यासाठीच्या कमिटीकडून अंतिम निर्णय घेतला जात असतानाच तत्कालिन संरक्षण मंत्री ए.के. ऍन्टोनी यांनी अचानक हस्तक्षेप केला आणि हा करार रद्दबातल करण्यात आला. “हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स’बरोबर चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर विमानांची किंमत वाढते आहे असे दासॉल्ट एव्हिएशनला वाटले होते.

भारतात उत्पादन केल्यास त्या उत्पादनाबाबतची हमी द्यावी लागली असती. मात्र ही हमी देण्याची “हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स’ची तयारी नव्हती, असेही सितारामन यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)