हिंदुस्थान ऍरोनॉटिक्‍स कंपनी आर्थिक अडचणीत

तीन दशकानंतर प्रथमच कंपनीवर उधारउसनवारीची वेळ

लष्कराकडून 15 हजार 700 कोटींचे येणे थकले

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवी दिल्ली: सरकारी मालकीची देशातील पहिली विमान कंपनी असलेल्या हिंदुस्थान ऍरोनॉटिक्‍स कंपनीपुढे सध्या मोठी आर्थिक अडचण उद्‌भवली आहे. या कंपनीवर प्रथमच गेल्या तीन दशकांमध्ये कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी एक हजार कोटी रूपयांची उधारउसनवारी करावी लागणार आहे. गेल्या एप्रिल महिन्यांपासून कंपनीला मिळणारे कामही थांबले असून कंपनीकडे सध्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या पुर्ण करणेही कंपनीला आर्थिक अडचणींमुळे अशक्‍य बनले आहे. या कंपनीवर जबरदस्तीने ही वेळ आणली जात असल्याची कर्मचाऱ्यांची भावना आहे. कंपनीला लष्कराकडून तब्बल 15 हजार 700 कोटी रूपयांचे येणे आहे. ते थकले असल्याने कंपनीची ओढाताण सुरू झाली आहे. आजवर या कंपनीला अशी वेळ कधीच आली नव्हती. ती यंदा प्रथमच आली आहे.

कंपनीची कर्मचारी क्षमता सुमारे 29 हजार इतकी आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारावर कंपनीचे दर महिन्याला 358 कोटी रूपये खर्च होतात. तर कंपनीचा सरासरी मासिक खर्च 1400 कोटी रूपये इतका आहे. या कंपनीकडे आजही तब्बल 61 हजार कोटी रूपयांच्या ऑर्डर्स आहेत पण कंपनीला मिळणारा आर्थिक स्त्रोतच आटल्यामुळे या ऑडर्स पुर्ण करणे कंपनीसाठी अवघड बनले आहे. या कंपनीचे भारतीय हवाईदलाकडे दहा हजार कोटी रूपयांचे येणे बाकी आहे पण गेल्या सप्टेंबर 2017 पासून हवाईदलाने हिंदुस्थान ऍरोनॉटिक्‍स लि कंपनीला पैसे देणेच थांबवले आहे.

या कंपनीला अर्थसंकल्पीय तरतूदीतून 33715 कोटी रूपये मिळणे अपेक्षित होते पण सरकारने या कंपनीला सापत्न भावाची वागणूक देण्याची भूमिका घेतल्याने कंपनीपुढील आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. परिणामी कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच कंपनीला राफेलचे कंत्राट मिळणार होंते पण ते कंत्राट अनिल अंबानी यांच्या कंपनीला दिले गेले. त्यामुळे कंपनीचा मोठा बिझनेस लॉस झाल्याचा विषय सध्या राजकीय वादाचा विषय बनला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)