हिंदुत्वाच्या मुद्यावर असलेली शिवसेनेसोबतची युती टिकली पाहिजे – नितीन गडकरी

मुंबई: हिंदुत्वाच्या मुद्यावर असलेली शिवसेनेसोबतची युती टिकली पाहिजे, असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी म्हटले. शिवसेना आणि भाजपामध्ये सतत उडत असलेल्या खटक्यांच्या पार्श्वभूमीवर गडकरींना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना, शिवसेना आणि भाजपाचे नाते ‘तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’, असे गडकरींनी म्हटले.

शिवसेना आणि भाजपाकडून वारंवार एकमेकांवर टीका केली जाते, याबद्दल मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत नितीन गडकरींना प्रश्न विचारण्यात आले. यावर मी दिल्लीला असल्यानं मराठी वृत्तपत्र फारशी वाचायला मिळत नाही, असे उत्तर गडकरींनी दिले. सध्या देशभरात वाहतूक क्षेत्रात मोठमोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे इतर गोष्टींकडे पाहायला फारसा वेळ मिळत नसल्याचेही ते म्हणाले. मात्र शिवसेनेसोबतची युती कायम राहायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले. शिवसेनेसोबतची युती ही हिंदुत्वाच्या मुद्यावर आधारित आहे. त्यामुळे ती टिकायला हवी, असे गडकरींनी म्हटले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सभांमधून वारंवार ‘एकला चलो रे’ची भूमिका मांडली आहे. यानंतर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेसोबत युती होईल, असा विश्वास व्यक्त केला. मात्र यानंतरही शिवसेना स्वबळावर निवडणूक लढण्यावर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्ती करणार का, असा प्रश्न गडकरींना विचारण्यात आला. याला पक्षानं सूचना केल्यास शिवसेनेशी संवाद साधू, असे उत्तर त्यांनी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)