हिंदुंना वर्चस्व गाजवण्याची अभिलाषा नाही – मोहन भागवत

शिकागो – हिंदुंना वर्चस्व गाजवण्याची अभिलाषा नाही असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. येथे सुरू असलेल्या वर्ल्ड हिंदु कॉंग्रेस मध्ये बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. सर्व हिंदुंनी मानवजातीच्या उत्थानासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ते म्हणाले की व्यापक एकतेसाठी अहंकारावर नियंत्रण ठेऊन सर्वसंमतीचा स्वीकार करणे ही एक महत्वाची बाब आहे त्याचा अंगीकार आपण केला पाहिजे. एकीच्या सामर्थ्याचे महत्व नमूद करताना ते म्हणाले की जर सिंह एकटा असला तर जंगली कुत्री त्याचा फडशा पाडतात. त्यामुळे एकी महत्वाची आहे.

आपल्याला हे जग चांगले बनावयचे आहे. आपल्याला कोणावरही वर्चस्व गाजवायचे नाही. कोणाला पराभूत करून किंवा वसाहतवादी मानसिकतेतून आपल्याला प्रभाव निर्माण करायचा नाही. हिंदु धर्म हा प्राचीन असला तरी तो आधुनिकतेची कास धरणारा आहे असे त्यांनी नमूद केले. िंहंदुंनी एक समाज म्हणून एकत्र कार्य केले तरच हिंदुंचा विकास होऊ शकतो. एकत्रितपणे किंवा संघटीतपणे कार्य करण्यासाठीची पद्धत आणि कल्पना विकसित करण्यासाठी आणि त्या रूजवण्यासाठी काय केले पाहिजे याचा उपस्थितांनी विचार केला पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. हिंदुंमध्ये अनेक गुणवंत व्यक्ती आहेत पण ते कधीच एकत्र येत नाही.

हिंदुंना एकत्र आणणे हीच सध्या एक मोठी समस्या आहे. आपल्या धर्माची मूलभूत तत्वे आपण विसरल्याने आणि आपली धार्मिकता आपण विसरल्याने हिंदुंना हजारो वर्षे कष्टात काढावी लागली आहेत. त्यामुळे आता आपल्याला एक आल्याशिवाय गत्यंतर नाही.

हिंदु हा कोणाचा विरोध करण्यासाठी कधीच जगत नसतो. जीवजंतुंनाही जगण्याचा अधिकार आहे अशीच आमची भावना असते. हिंदुंनाही विरोध करणारे आहेत पण या विरोधकांना कोणतीही हानी न पोहचवता त्यांना आपण हाताळले पाहिजे असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)