हिंदी चित्रपटसृष्टी अधिक धर्मनिरपेक्ष – रविना टंडन

नवी दिल्ली – धर्माच्या बाबतीत हिंदी चित्रपटसृष्टी अधिक धर्मनिरपेक्ष असल्याचे मत अभिनेत्री रविना टंडनने व्यक्त केले. ‘मातृ’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राजधानीत आलेल्या रविनाला सोनू निगमच्या अजानच्या वक्तव्याबद्दल विचारले असता तिने आपले मत मांडले.

सोनू निगमने आपल्या वक्तव्यानंतर माफी मागत आपले मुंडन केले होते. रविना म्हणाली, “जर आपण देशाची सद्य स्थिती पाहिली, कोणत्याही धर्माच्या लोकांना पाहिले, तर धार्मिक कट्टरता चुकीची आहे. आपण नेहमीच धर्मनिरपेक्ष आणि मजबूत देशात राहतो. आपण ही गोष्ट निरंतर ठेवली पाहिजे.”

रविना पुढे म्हणाली, “जर दिवाळीत फटाके उडवण्यावर नियंत्रण ठेवले जात असेल तर त्याचे मी समर्थन करते. याचा अर्थ मी सांप्रदायिक झाले असा होत नाही. हे प्रत्येक व्यक्ती कसा विचार करते यावर अवलंबून आहे.” ती म्हणाली, “आपल्याला आधुनिक आणि जास्त धर्मनिरपेक्ष तथा उदार भारताच्या दिशेने जायचे आहे, यावर मी विश्वास ठेवते.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)