हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा राजकुमार 

लक्ष्मीकांत कुलकर्णी 

हिंदी चित्रपटसृष्टीतील कुशल अभिनेते राजकुमार यांचा स्मृतिदिन नुकताच झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या कुशल अभिनयाचे पैलू आजमावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. राजकुमार यांनी जितक्‍या चरित्र भूमिका साकारल्या त्यापेक्षाही “वक्‍त’मधील रोलपासूनच अभिनय कुशल कलाकार म्हणून अल्पावधीत राजकुमार लोकप्रिय झाले. रहस्यमय चित्रपट “हमराज’ सारख्या चित्रपटात धीरोदात्त व्यक्तिमत्व, शब्दांची फेक व विशेष प्रभावी उच्चार यामुळे पडद्यावरील राजकुमार इतर कलाकारांच्या छबीला मारक ठरतात. त्यांच्याबरोबर काम करणारा अन्य कोणताही कलाकार अक्षरशः फिका पडायचा.

राजकुमार यांचे संवाद सदततच गाजत राहिले. “वक्‍त’मधील राजकुमार यांच्या तोंडी असलेले कित्येक संवाद पुढे कित्येक वर्षे प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. “जिनके घर शिशोंके होते है, वो दुसरोंपर पत्थर फेंका नहीं करते’ यासारखे डायलॉग तर गल्लोगल्ली बोलले जाऊ लागले होते. “वक्‍त’मध्ये राजकुमार यांनी ड्युएल पर्सनॅलिटी दाखवली होती, त्याला अजिबात तोड नाही. पियानोवर साधना जेंव्हा “इन निगाहोंमे चमक जाग उठी..’ हे गाणे गात असते, त्यावेळी राजकुमार दरवाजा उघडून आत येतो. ती दार उघडण्याची स्टाईल, हातातील किल्ल्यांचा जुडगा फिरवत फिरतवत राजकुमार जीना चढत येतो. राजकुमार यांना वाटत असते की साधना हे गाणे आपल्यासाठीच म्हणते आहे. त्यामुळे मनात असलेली हुरहुर राजकुमार यांनी अभिनयाद्वारे दाखवली आहे. त्यांचे असे अनेक कलागुण राजकुमार यांच्याबाबतीत दिसून येतात.

या चित्रपटात एक प्रतिष्ठित बिझनेसमन म्हणून राजकुमार समाजात वावरत असतात. पण प्रत्यक्ष्यात तसे नसते. अगदी उलट परिस्थितीत परिस्थितीशी झुंजत राजकुमार यांनी साधनाचा हिऱ्यांचा हार चोरलेला असतो. राजकुमार यांच्या चालण्याच्या स्टाईलमधून त्यांची ही ड्युएल पर्सनॅलिटी दाखवून दिली आहे. याच चित्रपटात राजकुमार आणि सुनिल दत्त यांच्यात कार रेसही होते. विजेत्याला साधना बक्षिस देणार असे ठरले असते. रेस जिंकल्यावर साधना म्हणते, “मागा काय हवे तुम्हाला..’ तेंव्हा राजकुमार म्हणतात, “जेंव्हा गरज असेल तेंव्हा मागून घेईन.’

यानंतरच्या दृश्‍यातील राजकुमार यांचा अभिनय म्हणजे त्यांच्या कुशल अभिनयाचा कळसच आहे. झोपाळ्यावर बसलेल्या साधनाला राजकुमार आपल्या बक्षिसाची आठवण करतो. तो साधनाचा हात मागणार असतो. पण साधनाच पटकन बोलून जाते की तिची आणि सुनिल दत्तची एंगेजमेंट झाली आहे. त्यावेळी राजकुमारच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर उतरतात. हे भाव राजकुमार यांच्याइतके सुंदर दुसरे कोणीच दाखवू शकले नसते. याच प्रमाणे राजकुमार यांचे “दिल एक मंडिर’, “पाकिजा’, “मेरे हुजुर’ या चित्रपटांमधील अभिनयही थक्क करून सोडणारा आहे. रहस्यमय चित्रपटात राजकुमार यांचा अभिनय नेहमीच लक्षणीय असायचा. अशा या रुबाबदार पर्सनॅलिटीच्या राजकुमार यांनी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवून सोडला. या कुशल कलाकाराच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या अभिनयगुणांची ही उजळणी करून श्रद्धांजली वाहण्याचा हा प्रयत्न.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)