हिंदकेसरी होवून महाराष्ट्राचा नावलौकीक वाढविणार

महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेख यांचा गौरव

सातारा,दि.9 प्रतिनिधी- महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेख यांचा नुकताच साताऱ्यात गौरव करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीचा स्पर्श होण्याचे भाग्य लाभले, अशी प्रतिक्रिया पै.शेख यांनी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्र केसरीनंतर आता हिंदकेसरीची गदा महाराष्ट्रात आणून राज्याचा नावलौकीक वाढविण्याचा आपला निर्धार आहे. त्या दृष्टीने तयारी करण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन पै.शेख यांनी केले. दरम्यान यावेळी उद्योगपती बाबाशेठ तांबोळी यांनी पै.बाला रफीक शेख यांना 25 हजार रूपयांचा धनादेश व साताऱ्याचे कंदी पेढे देवून गौरव केला. राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शफीक शेख यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पै.बाळासाहेब पडघन, डबल उपमहाराष्ट्र केसरी पै.भरत आवाडे, नगरसेवक मिलींद काकडे, धनंजय जांभळे, शब्बीरभाई सय्यद, जुबेर बागवान, इर्शाद बागवान, दानिश बागवान, अस्लम सुतार आदी.उपस्थित होते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)