हिंजवडी सामुहिक बलात्कार प्रकरण : तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ

पुणे- चॉकलेट देण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन दोन बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्कार करून एका मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अटक केलेल्या तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. एकाच्या पोलीस कोठडीत 1 ऑक्‍टोबर, तर दोघांच्या पोलीस कोठडीत 3 ऑक्‍टोबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश विशेष न्यायाधीश आर.एन.अदोने यांनी दिला आहे.
गणेश शालिक निकम (वय 22, रा. संत तुकाराम सहकारी, कासारसाई, मुळशी, मुळ रा. आंचलगाव, जळगाव) याच्या पोलीस कोठडीत 1, तर, सुमिरन गुरूदास गायकवाड (18) आणि सोमनाथ अतिष वाघोले (23, दोघेही रा. मु. पो. दारूंब्रे, पो. साळुंब्रे ता. मावळ) या दोघांच्या पोलीस कोठडीत 3 ऑक्‍टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाची रवानगी बाल सुधारणागृहात करण्यात आली आहे. घटनेतील एका पीडितेचा मृत्यू झाला आहे. एका पीडितेच्या आईने हिंजवडी पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात ऍट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल केला आहे. 16 सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते चार दरम्यान हिंजवडीजवळ असलेल्या संत तुकाराम महाराज मंदिराच्या मागील जंगलात हा प्रकार घडला. न्यायालयात हजर केलेल्या तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी ऍट्रॉसिटीचे विशेष सरकारी वकील विजय पाटील यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)