हिंजवडी सामुहिक प्रकरणात ऍट्रॉसिटीनुसार गुन्हा : आणखी दोघांना अटक

पुणे- चॉकलेट देण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन दोन बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करून एका मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. दरम्यान, या गुन्ह्यात ऍट्रॉसिटी कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता अटक केलेले दोघे आणि यापूर्वी अटक केलेला एकजण, अशा तिघांना दि. 29 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश आर. एन. अदोने यांनी दिला आहे. सुमिरन गुरूदास गायकवाड (18) आणि सोमनाथ अतिष वाघोले (23, दोघेही रा. मु. पो. दारूंब्रे, पो. साळुंब्रे ता. मावळ), अशी नवीन अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. गणेश शालिक निकम (वय 22, रा. संत तुकाराम सहकारी, कासारसाई, मुळशी, मूळ रा. आंचलगाव, जळगाव) याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तर यापूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाची रवानगी बाल सुधारणागृहात करण्यात आली आहे. घटनेतील एका पीडितेचा मृत्यू झाला आहे. एका पीडितेच्या आईने हिंजवडी पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे. 16 सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते चार दरम्यान हिंजवडीजवळ असलेल्या संत तुकाराम महाराज मंदिराच्या मागील जंगलात हा प्रकार घडला. न्यायालयात हजर केलेल्या तिघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी ऍट्रॉसिटीचे विशेष सरकारी वकील विजय पाटील यांनी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)