हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम गुरूवारपासून

– “पीएमआरडीए’ कार्यालयात आढावा बैठक
 
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचे प्रत्यक्ष काम येत्या गुरुवारपासून (दि.10) सुरू होणार आहे. औंध येथील “पीएमआरडीए’ कार्यालयात पालकमंत्री गिरीश बापट यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

या बैठकीस आयुक्त किरण गित्ते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कविता द्विवेदी, प्रवीणकुमार देवरे, मिलिंद पाठक, उपजिल्हाधिकारी सुहास मापारी, महानगर नियोजनकार विजयकुमार गोस्वामी, विवेक खरवडकर आदी उपस्थित होते. या बैठकीत मेट्रोसह, रिंगरोड, टीपी स्कीम तसेच “पीएमआरडीए’ होर्डिंग पॉलिसी व अनधिकृत बांधकाम आदी विषयांची सद्यस्थितीचा आढावा बापट यांनी घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

टाटा-सिमेन्स कंपनीच्या प्रतिनिधीसोबत शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या कामाकाजाचे टप्प्यांमध्ये होणारे डिझाइन, मेट्रो अलाइंमेंट व व्यवहार्यता तफावत निधीसाठी आवश्‍यक शासकीय जमिनी, मेट्रो सुरक्षा तसेच मेट्रोला लागणारी जागा, स्थानके, विकास आराखड्यावर सुरू असलेल्या बदलांवर चर्चा झाली. त्याचप्रमाणे मेट्रो व रिंगरोडची कामे सुरू असताना नागरिकांना कोणतीही हानी पोहचणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना बापट यांनी दिल्या. “पीएमआरडीए’ मेट्रोचे दि. 10 जानेवारीपासून प्रत्यक्ष मूळ ग्राउंड मार्किंग सुरू होणार असल्याची माहिती टाटा-सिमेन्सच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

अडीच हजार घरांना नोटीस, 47 जणांवर गुन्हे

“पीएमआरडीए’ क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम 2 हजार 433 नोटीस बजाविल्या आहेत. तसेच 1 हजार 436 नोटीसवर “पीएमआरडीए’ने निर्णय प्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच 194 बांधकामावर कारवाई करून 2 लाख 50 हजार चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले आहे. अनधिकृत बांधकामाला अडथळा ठरणाऱ्या 47 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यायोग्य असलेल्या बांधकामधारकांना पत्र पाठवून सूचनादेखील दिल्याचे “पीएमआरडीए’कडून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)