हिंजवडी पाठोपाठ वाकड येथील वाहतुकीत बदल

पिंपरी – हिंजवडी येथील वाहतूक कोंडी सोडवल्यानंतर या बदलाचा ताण वाकड परिसरात येत असल्याने वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या सूचना व हरकतीनंतर वाकड येथील वाहतुकीत देखील बदल केला आहे. यासाठी वाहतूक पोलिसांनी 26 ऑक्‍टोबरपर्यंत नागरिकांच्या लेखी सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या.

हा बदल मुख्यत्वेकरुन भूमकर चौकात करण्यात आला आहे. त्यानुसार हिंजवडीकडून येणाऱ्या सर्व वाहनांना भूमकर चौकातून उजवीकडे वळण्यात पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. यासाठी वाहनांनी काळाखडक इथंपर्यंत जाऊन “यू टर्न’ घ्यावा व तेथून इच्छितस्थळी जावे. तसेच डांगे चौक येथून येणाऱ्या वाहनांना देखील भूमकर चौकातून उजवीकडे वळता येणार नाही यासाठी वाहनांना मारुंजी येथील वाय जंक्‍शन येथून “यु टर्न’ घेऊन इच्छितस्थळी जाता येणार आहे. शनी मंदिर ते भूमकर चौक व सयाजी हॉटेल ते भूमकर चौक हे सर्व्हिस रोड दुहेरी मार्ग करण्यात येत आहेत. मायकर शोरुम येथून याणाऱ्या वाहनांना भूमकर चौकातून उजवीकडे वळण्यास व सरळ जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना मारुंजी येथूल वाय जंक्‍शन येथून “यु टर्न’ घेऊन इच्छित स्थळी जाता येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिंजर हॉटेल येथून भूमकर चौकात येणाऱ्या वाहनांना उजवीकडे वळण्यास व सरळ जाण्यास बंदी करण्यात आली असून त्यांना काळाखडक येथून युटर्न घेऊन इच्छित स्थळी जावे लागणार आहे. तसेच डांगे चौकाकडून येणाऱ्या वाहनांना भूमकर चौकात येऊन डावीकडे वळून मायकर शोरुमकडे जाता येणार नाही. या बदलामुळे हिंजवडीतील चक्राकार वाहतुकीचा जो वाकड परिसरात ताण येत होता तो येणार नाही. बदल नागरिकांच्या अंगवळणी पडला तर त्यांना तो गैरसोयीचा वाटणार नाही, असा विश्‍वास हिंजवडी वाहतूक पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र हा बदल शनिवार व रविवार सुट्टी असल्यामुळे जाणावणार नसून सोमवारी (दि. 29) त्याचे परिणाम दिसण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)