हिंजवडी अत्याचाराच्या निषेधार्थ तळेगावात मोर्चा

तळेगाव स्टेशन – कासारसाई (हिंजवडी) येथील दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाऱ्याच्या निषेधार्थ तळेगाव दाभाडे येथे जायंट्‌स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडेच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये आरोपींवरील खटला “फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवावा व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, असे निवेदन पोलीस यंत्रणेला देण्यात आले. या निवेदन तळेगाव दाभाडे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे यांनी स्वीकारले.

मोर्चाची सुरवात मराठा क्रांती शिल्पास पुष्पहार अर्पण करून सकाळी दहा वाजता मराठा क्रांती चौकातून सुरवात झाली. रेल्वे स्टेशन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, उद्योगधाम मार्गाने समारोप मराठा क्रांती चौकात करण्यात आला. या वेळी जायंट्‌स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष देविदास टिळे, संस्थापक अध्यक्ष संदीप गोंदेगावे, संचालिका कल्याणी लोखंडे, नगरसेविका सुलोचना आवारे, नगरसेवक रोहित लांघे, सचिन टकले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी आपल्या मनोगतात झालेल्या घटनेचा निषेध व्यक्‍त करीत आरोपींना त्वरित फाशी देण्यात यावी, असे सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वेळी जायंट्‌स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडे उपाध्यक्ष हिरामण बोत्रे, संचालक व सदस्य आण्णाराव कोळी, माऊली लोखंडे, गुलाब पारखी, सूरज कुर्डे, शैलेश सिंग, बाळासाहेब जामदार, जयश्री टिळे, राजश्री गोंदेगावे, सुप्रिया कुर्डे तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक सुरेश शिंदे, शिवाजी कारडे, चंदन कारके व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)