हिंजवडीमध्ये तरुणीची आत्महत्या

पिंपरी – हिंजवडी येथे 18 वर्षीय तरुणीने गोदामात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. 17) सकाळी सहाच्या सुमारास घडली.

हसीना पटेल (वय-18, रा. हिंजवडी फेज दोन, मूळ रा. कर्नाटक) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसीनाचे वडील हिंजवडी येथील मॅगीच्या वितरकाकडे रखवालदार म्हणून काम करत आहेत. गोदामाशेजारी पटेल कुटुंब राहण्यास आहे. पहाटे हसीनाचे आई आणि वडील दोघेही कामावर गेले. तिच्या भावाने गोदामाचे शटर उघडले असता हा प्रकार उघडकीस आला. हसीनाने गोदामातील एका लोखंडी रॉडला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)