हिंजवडीत साडेचार हजारा मुलांना रुबेला लस

माण आरोग्य केंद्रा अंतर्गत गावागावांत लसीकरणास प्रारंभ

हिंजवडी- गोवर आणि रूबेला प्रतिबंधक लस हिंजवडी येथील प्राथमिक शाळेत मुलांना टोचण्यात आली. माण आरोग्य केंद्राच्या अंतर्गत मुळशी तालुक्‍यातील 22 गावे येतात, त्यापैकी 4 ते 5 गावात आत्तापर्यंत साडेतीन ते चार हजार मुलांना लस देण्यात आली आहे.
हिंजवडी येथे लस देण्यासाठी शुभारंभ प्रसंगी मुळशीच्या सभापती कोमल साखरे, तहसीलदार सचिन डोंगरे, हिंजवडी सरपंच दीपाली साखरे, ग्रामपंचायत सदस्य सिमा साखरे, उमेश साखरे, स्मिता जांभुळकर, मुख्याध्यापक वाघूलकर, डॉ. लकडे, विस्तार अधिकारी एस.डी. जाधव, ग्रामविकास अधिकारी तुळशीराम रायरीकर, संदीप साखरे, तलाठी वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
माण प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. लकडे यांनी माहिती दिली की, गोवर रुबेलाची लस देताना काटेकोरपणे काळजी घेतली जातेय. लसीचा दर्जा तपासला जातोय. एक इंजेक्‍शन एकदाच वापरले जाते. कारण एका वापरानंतर ते पूर्णपणे जाम होऊन जाते, त्यामुळे त्याचा पुनःर्वापर होऊच शकत नाही. 9 महिने ते 15 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना लस देणे आवश्‍यक आहे. माण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत 22 गावांत 23 हजार मुलांना लस देण्याचे ध्येय आहे. माण गावातील जिल्हा परिषद शाळेत सर्वधिक 1275 च्या वर लस देण्यात आल्या आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)