हिंजवडीत “बर्निंग कार’चा थरार

  • मोटरीत होरपळून महिलेचा मृत्यू

पिंपरी – धावत्या मोटरीने अचानक पेट घेतल्याने कारमधील 44 वर्षीय महिलेचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वाकड जकात नाक्‍याजवळ सोमवारी (दि. 10) पहाटे एकच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या थरारक घटनेत महिलेचा पती जखमी झाला आहे.

संगीता मनीष हिवाळे (वय 44, रा. नखाते वस्ती, काळेवाडी) असे होरपळून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथून रुग्णालयातून संगीता या त्यांच्या कुटुंबियांसह मोटरीतून घरी परतत होते. त्यावेळी मोटारीतून संगीता हिवाळे, त्यांचे पती मनीष हिवाळे, मनिष यांच्या आई, मुलगा व भाचा असे पाच जण होते. मोटार ही “सीएनजी’वर चालणारी होती.

यावेळी वाकड मधील जकात नाक्‍यासमोर येताच त्यांच्या कारने अचानक पेट घेतला. मनिष यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने आई, मुलगा आणि भाच्याला मोटारीतून बाहेर काढले. संगीता यांना बाहेर काढत असताना मोटारीतून “लॉक’ झाली क्षणात मोटारीत भडका उडाला. त्यांना वाचवण्याचा मनिष यांनी पुरेपुर प्रयत्न केला; पण तोपर्यंत आग भडकली होती. या दुर्दैवी घटनेत संगीता यांचा होरपळून मृत्यू झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)