हिंजवडीत “पिक अवर’मध्ये जड वाहनांना “नो एन्ट्री’

पिंपरी – हिंजवडी परिसरातील वाहतूक नियमनासाठी गेल्या महिनाभरापासून वाहतूक पोलीस वेगवेगळे बदल करुन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानुसार शनिवारपासून (दि. 6) हिंजवडी परिसरात सकाळी आठ ते बारा व सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत जड वाहनांना पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे.

प्रायोगिक तत्त्वावर 27 सप्टेंबर पासून जड वाहनांना हिंजवडी परिसरात पिक अवरमध्ये बंदी करण्यात आली होती. मात्र त्यावर नागरिकांच्या सूचना व हरकती पोलिसांनी मागवल्या होत्या. हरकती सुचनांमध्ये देखील जड वाहनांनी “पिक अवर’ला आयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडी करु नये अशा सूचना नागरिकांनी दिल्या. त्यामुळे यापुढे हा बदल कायम राहणार आहे.

-Ads-

बदलानुसार डांगे चौकातून भूमकर चौकाकडे जाणारा मार्ग, वाकड ब्रीजवरून व वाकड नाका येथून इंडियन ऑईल चौकाकडे जाणारा मार्ग, मुंबई -बॅंगलोर महामार्गावरुन जिंजर हॉटेल येथून डावीकडे वळून भूमकर चौक व डांगे चौकाकडे जाणारा मार्ग, मुंबई-बॅंगलोर महामार्गावरून मायकर शोरूम येथून डावीकडे वळून भूमकर चौक अथवा डांगे चौकाकडे तसेच हिंजवडी आयटीपार्कमध्ये जाणारे सर्व मार्ग या साऱ्या मार्गावर सकाळी आठ ते बारा व सायंकाळी पाच ते आठ या वेळेत म्हणजे “पिक अवर’मध्ये जड वाहने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतुकीला गती येणार असून या बदलामुळे आटीयन्सचे आणखी दहा मिनिटे वाचणार आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)