हिंजवडीत चंदन चोरीचा प्रयत्न

पिंपरी – हिंजवडी फेज दोन मधील इन्फोसिस कंपनीच्या आवारात शनिवारी (दि. 29) मध्यरात्रीच्या सुमारास चंदनाचे झाड चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार रविवारी (दि.30) सकाळी उघडकीस आली.

याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सुरक्षा रक्षक व सीसीटीव्हीचा कडेकोट बंदोबस्त असताना देखील, कंपनीच्या आवारात घुसून चंदनाचे झाड तोडले जाते व ते चोरण्याचा प्रयत्न होतो याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी अज्ञाता विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, पेट्रोलींग, पोलीस यंत्रणा सर्वच यंत्रणा असून देखील चोरीचा प्रयत्न झाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कारण सुरक्षेसाठी कंपनीच्या भोवताली असलेल्या तार कंपाऊंडला रात्रीच्या वेळी विद्युत करंट लावलेला असतो असे समजते, तरीही हा चोरीचा प्रयत्न झाल्याने कंपनी व्यवस्थापन व पोलीस चक्रावून गेले आहेत. पोलिसांनी घटना स्ळाची पाहणी केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या घटनेमुळे आयटी परिसरातील सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)