पिंपरी – अवैधरित्या गुटखा आणि विदेशी सिगारेट विक्री सुरु असलेल्या एका दुकानावर धाड टाकून पोलिसांनी तब्बल 474 बॉक्‍स विदेशी सिगारेट आणि 43 हजार 77 रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई हिंजवडी येथील मेझा 9 चौकातील दुकानावर करण्यात आली.

याप्रकरणी दुकान मालक नथमल मदनलाल सिरवी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलिसांना मुंबई येथील एका सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकाने मेझा 9 चौकातील सिरवी याच्या दुकानात मोठ्या प्रमाणात विदेशी सिगारेट आणि गुटख्याचा साठा आहे, अशी माहिती दिली होती. पोलिसांनी त्यानुसार नथमल सिरवी यांच्या दुकानावर धाड टाकत कारवाई केली. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)