हिंजवडीतील चक्राकार वाहतूक कायम

पिंपरी – हिंजवडी मधील शिवाजी चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी, वाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि विना अडथळा सुरू ठेवण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करत वाहतूक विभागाने चक्राकार वाहतुकीबाबत अंतिम आदेश काढला आहे. शिवाजी चौक ते विप्रो सर्कल फेज एक ते जॉमेट्रिक सर्कल चौक ते शिवाजी चौक या मार्गावर चक्राकार वाहतूक करण्यात आली आहे. हा बदल आता हिंजवडी परिसरात कायम राहणार आहे.

अशी आहे चक्राकार वाहतूक – शिवाजी चौकातून डावीकडे वळून विप्रोसर्कल फेज वन येथून उजवीकडून वळून जॉमेट्रीक सर्कल चौक येथून सर्व प्रकारच्या वाहनांनी इच्छित स्थळी जावे. शिवाजी चौकातून उजवीकडे वळण्यास व यु-टर्न घेण्यास सर्व प्रकारच्या वाहनास मनाई करण्यात आली आहे. शिवाजी चौकात येणाऱ्या आयटी कंपन्यांच्या बसेस व इतर सर्व जड वाहनांना वाकड ब्रीजकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. आयटी कंपन्यांच्या बसेस व अवजड वाहनांनी शिवाजी चौकातून डावीकडे वळून कस्तुरी चौकातून उजवीकडे वळून इंडियन ऑइल चौकातून इच्छीत स्थळी जावे. यामध्ये पीएमपीएमएल बसेस, अग्निशमन दलाच्या वाहनांना वगळण्यात आले आहे.

जांभूळकर जीम व शेल पेट्रोलपंपा जवळील डिव्हायडर पंक्‍चर हा स्थानिक नागरिकांसाठी कायम स्वरुपी खुला ठेवण्यात येणार आहे. इंडियन ऑईल पंप ते शिवाजी चौक दरम्यान असलेल्या डी-मार्ट येथील डिव्हायडर पंक्‍चर, शिवाजी चौक ते फेज वन सर्कल येथील पाच डिव्हायडर पंक्‍चर फेज वन चौक ते जॉमेट्रीक सर्कल चौक दरम्यानचे सर्व डिव्हायडर पंक्‍चर आणि मेझा -9 चौक ते शिवाजी चौक दरम्यानचे तीनही डिव्हाडर पंक्‍चर बंद करण्यात येत आहेत. तसेच जॉमेट्रिक सर्कल ते विप्रो सर्कल फेज दोन दरम्यानचे सर्व डिव्हायडर पंक्‍चर बंद केले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)