हिंजवडीतील चक्राकार वाहतूक पुढील 15 दिवस कायम

पिंपरी – हिंजवडी वाहतूक पोलिसांनी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या आदेशानुसार शिवाजी चौकातून 3 सप्टेंबरपासून चक्राकार वाहतुकीला सुरुवात केली होती. या बदलाबाबत हिंजवडी वाहतूक पोलिसांनी आयटीयन्स व स्थानिक नागरिकांना त्यांच्या हरकती व सुचना 9 सप्टेंबर पर्यंत मागवल्या होत्या. या सुचना व हरकतीनुसारच आणखी 15 दिवस चक्राकार वाहतूक सुरु ठेवण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला आहे.

प्रायोगिक तत्त्वावर हा बदल 10 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या कालावधीत सुरु ठेवण्यात येणार आहे. यासाठी आयुक्तालयात नागरिकांनी त्यांच्या हरकती लेखी स्वरुपात पाठवल्या होत्या. यामध्ये नागरिकांनी काही बदल सुचवत वाहतूक पोलिसांचे व नवीन आयुक्तांच्या निर्णयाचे कौतुकच केले आहे. एमआयडीसी प्रशासनानेही पोलिसांना याबाबत सहकार्य करायला सुरुवात केली असून शनिवारी (दि. 8) झालेल्या अतिक्रमण कारवाईनंतर रविवारी (दि.9) हिंजवडी परिसरातील रस्त्यांची डागडुचीचे काम एमआयडीसीने हाती घेतले आहे. या बदलामुळे नेहमीच्या वेळेपेक्षा आयटीयन्सचे 15 ते 20 मिनिटे कमी लागत आहेत. त्यानुसार पुढील बदल 24 सप्टेंबर पर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे.

त्यानुसार, शिवाजी चौकातून उजवीकडे वळण्यास व “यु टर्न’ घेण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. भूमकर चौकापासून शिवाजी चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. या सर्व वाहनांना शिवाजी चौकातून सरळ विप्रो सर्कल फेज -1 येथून इच्छित स्थळी जावे लागणार आहे. माणगाव रोड वरुन विप्रो सर्कल फेज-1 चौकातून शिवाजी चौकाकडे सरळ जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. मेझा-9 चौकातून सर्व प्रकारच्या वाहनांना उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. या बदलाबाबत नागरिकांना 24 सप्टेंबरपर्यंत चिंचवड येथील पोलीस आयुक्‍तालयात सूचना पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सूचनांवरुन हिंजवडीच्या वाहतुकीबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

पोलिसांकडे आलेल्या महत्त्वाच्या सूचना
– आयटी कंपन्या आणि प्रशासनाच्या पुढाकारातून सार्वजनिक वाहतुकीला चालना द्यायला हवी.
– हिंजवडीच्या “एन्ट्री पॉईंट’ला खासगी वाहनांचे “पार्किंग’ करावे.
– रस्त्यांची गुणवत्ता सुधारणे तसेच वाहतुकीची शिस्त पाळणे या गोष्टी देखील परिसरात पाळल्या जाव्यात.
– बंद पडलेल्या वाहनांसाठी ठराविक अंतरावर “टो-व्हॅन’ असावी.
– नागरिकांसोबत वाहतूक पोलिसांनी सुसंवाद वाढवायला हवा.
– हिंजवडीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करावे.
– वाहतुकीत बदल करत असताना केवळ आयटी कंपन्यांसह गावकऱ्यांचाही विचार व्हावा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)