हिंजवडीच्या कोंडीवर पवारांचे “लक्ष्य’

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक : मयूर कलाटे यांना आश्‍वासन

पिंपरी – राज्यातील सर्वांत मोठे आयटी हब असलेल्या “हिंजवडी आयटी पार्क’मधील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले आहे. भाजप आणि शिवसेनेकडून दुर्लक्षित असलेल्या या मुद्यावर पवारांनी पुढाकार घेवून आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

वाकड उड्डाणपूल ते हिंजवडी फेज- 3 पर्यंत होणाऱ्या वाहतूक समस्येवर कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत शरद पवार लवकरच बैठक घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटे यांनी दिली. हिंजवडीमधील वाहतूक समस्यांचे निवेदन पवार यांना मुंबई येथे शनिवारी दिले. यावेळी हिंजवडीचे माजी सरपंच सागर साखरे, श्रीकांत जाधव उपस्थित होते.

हिंजवडीत दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना नोकरदार, कारखानदार व स्थानिक रहिवाशांना करावा लागत आहे. पिंपरी-चिंचवड व पुणे शहरच्या हद्दीवरच हिंजवडी इन्फोटेक पार्क विकसित झाला आहे. हिंजवडीमधील पायाभूत सुविधा विकसित करणेची जबाबदारी स्थानिक पंचायतीसह राज्याच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचीही आहे. हिंजवडीमधील वाहतूक कोंडीमुळे इंधन खर्चाबरोबर वेळही वाया जातो. यासह प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे, अशी भूमिका नगरसेवक कलाटे यांनी मांडली.

वाहतूक समस्येवर तोडगा निघणार?
हिंजवडीतील वाहतूक कोंडी कायम सोडविणेसाठी शरद पवार स्वतः लक्ष घालून खासदार सुप्रिया सुळे, पी.एम.आर.डी, एम.आय.डी.सी., वाहतूक पोलीस अधिकारी, पुणे, पिंपरीचे आयुक्त, आय.टी.पार्कचे प्रतिनिधी व हिंजवडी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा करुन कायमचा तोडगा काढण्यात येणार आहे, असे आश्‍वासन शरद पवार यांनी दिले आहे. त्यामुळे जटील झालेल्या या प्रश्‍नावर तोडगा निघणार का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)