हिंगोली नगरपरिषदेच्या वतीने दुर्बल घटकांना घरकुल

हिंगोली: येथील नगरपरिषदेच्या वतीने समाजातील दुर्बल घटकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समाज घटकांना प्राधान्याने लाभ मिळण्यासाठी तसा प्रस्ताव नगरपरिषदेच्या वतीने राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यानुसार हिंगोली नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामदास पाटील यांनी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या पुढाकाराने तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दोन लाख 50 हजार रुपये अनुदान घर बांधण्यासाठी देण्यात येते. तसेच ज्यांच्याकडे किमान सहाशे स्क्वेअर फूट जागा आहे अशा लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येते. परंतु त्यांच्याकडे जागाच नाही अशा लाभार्थ्यांना नगरपरिषदेच्यावतीने सहाशे चौरस फूट जागा विकत घेण्यासाठी सुद्धा अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. या जागेसाठी एकरकमी तीन लाख रुपये देण्यात येणार असून ही रक्कम संबंधित विक्रेत्याला देण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)