हिंगोलीत मुलासह महिलेची आत्महत्या

हिंगोली – हिंगोली येथील पोस्ट ऑफिस कार्यालय परिसरात एका महिलेने दीड वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्‍कादायक घटना घडली. टपाल विभागाच्या कार्यालय परिसरात एक विहीर असून या विहिरीत मंगळवारी संध्याकाळी सविता पार्डीकर (वय 25) या महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला.

याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. महिलेसोबत तिचा दीड वर्षांचा मुलगाही होता, अशी माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी विहिरीत मुलाचा शोध घेतला असता रात्री उशिरा पोलिसांना विहिरीत दीड वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला.
दरम्यान, महिलेने आत्महत्या का केली, हे अद्याप अस्पष्ट आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या नातेवाईकांचा जबाब घेण्यात येईल. त्यांनी तक्रार दिल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)