हिंगोलीत पन्नास लाखांचे प्रतिबंधित सिगारेट जप्त

A lot of cigarettes.

हिंगोली: प्रतिबंधित सिगारेटची दिल्ली येथून हैदराबादकडे वाहतूक करणाऱ्या दोन ट्रक येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून 58लाख 50 हजार रुपये किमतीचे पॅरिस सिगारेट जप्त करण्यात आले. हिंगोली पोलिसांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. हे ट्रक दिल्लीवरून हैदराबादकडे हिंगोली-कळमनुरी मार्गे जात होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार सुभान केंद्रे यांचे पथक रवाना झाले.

कळमनुरी तालुक्‍यातील पार्डी मोड येथे दोन्ही ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रक चालकांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून दोन्ही ट्रक पार्डी मोडपासून नांदेड मार्गावर 3 किमी अंतरावर अडविले. दोन्ही ट्रक कळमनुरी पोलीस स्टेशनला घेऊन आल्यावर ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये 58 लाख 50 हजार रुपये किमतीचे पॅरिस नावाचे सिगारेटचे बॉक्‍स आढळून आले. या सिगारेट पॉकेटवर कुठल्याही प्रकारचा वैधानिक इशारा लिहिलेला नाही. त्यामुळे मुद्देमाल आणि ट्रक असा एकूण 1 कोटी 21 लाख 41 हजार 490 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)