हिंगोलीत डिजिटल जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल 

हिंगोली – मोबाईलवर लुडो डिजिटल जुगार खेळणा-या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जुगाराबाबत माहिती मिळताच आखाडा बाळापुर पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने साध्या वेषात छापा मारून कारवाई केली. या प्रकरणी सात जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

कळमनुरी तालुक्‍यातील चुंचा या शिवारात मोबाईलवर लूडो गेम जुगारी खेळत असल्याची आखाडा बाळापुर पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर यांनी एका पथकाला सोबत घेऊन साध्या वेषात छापा टाकत जुगार खेळणाऱ्या सात जणांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून सहा मोबाईल व नदी रोख 45 हजार रुपये असा माल जप्त केला आहे. यात जुगारी संजय मोहिते, सुनील कनके, सिताराम पवार, परसराम जाधव, पांडुरंग चंद्रवंशी, सय्यद अरेफ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची ही डिजिटल जुगार खेळणाऱ्या विरुद्ध पहिलीच कारवाई आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)