हिंगोलीत जिल्हा कचेरी समोर पत्रकारांचे धरणे 

सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा 

हिंगोली – पत्रकार संरक्षण कायद्याची अमलबजावणी करावी, पत्रकार पेन्शन योजना लागू करणे, मजेठिया आयोगाच्या शिफारशींची अमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी सोमवारी जिल्हा कचेरी समोर पत्रकारांकडून धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी पाठिंबा जाहीर करून आपली मागणी आम्ही मुख्यमंत्र्याना सांगून सोडविण्याचे आश्वासन दिले.

रविवारी खासदार राजीव सातव, आमदार डॉ.संतोष टारफे यांनी पाठिंबा जाहीर केला. तर सोमवारी कॉंग्रेस,  भाजप, शिवसेना  आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी पत्रकारांच्या रास्त मागण्यासाठी पाठिंबा जाहीर केला. यावेळी माजीमंत्री सूर्यकांता पाटील, आमदार तानाजी मुट्‌कुळे, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार भाउराव पाटील, दिलीप चव्हाण, शिवसेनेचे बाजीराव सवंडकर यांनी मनोगत व्यक्त करून आश्‍वासन दिले.

यावेळी आंबेडकर प्रेस कौन्सिल चे संस्थापक अध्यक्ष रावण धाबे, महेंद्र पुरी, बाबा ढोकणे यांच्या सह मोठया संख्येने पत्रकारांची उपस्थिती होती.त्यानंतर शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)