हिंगोलीतील बसपा पदाधिकारी बडतर्फ

हिंगोली: बहुजन समाज पार्टीचे कळमनुरी येथील पदाधिकारी विजय बलखंडे, पिराजी इंगोले आणि सुनील घोंगडे यांची बहुजन समाज पक्षातून कायमस्वरूपी हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रज्ञावंत मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार ही कारवाई प्रदेश प्रभारी ना. तू. खंदारे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. बडतर्फ करण्यात आलेल्या या बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बडतर्फी करण्यात आल्यामुळे बसपामध्ये वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)