हिंगोलीचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक नामदेव मिठ्ठेवाड यांना अटक 

हिंगोली  – राज्य राखीव दलामध्ये 2011-12मध्ये पोलीस भरती घेण्यात आली होती. या भरतीत अनेक पोलीस कर्मचारी व अधिका-यांनी पैसे घेवून नोकरी लावल्याचे स्पष्ट झाले आहे. या भरती घोटाळ्याप्रकरणी अखेर तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक नामदेव मिठ्ठेवाड यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आल्या आहेत.

सविस्तर माहिती अशी की, हिंगोली जिल्हात 2011-12मध्ये राज्य राखीव पोलीस दलातील भरती घोटाळा सहा महीन्यांपूर्वी उघडकीस आला होता. यात नामदेव मिठ्ठेवाड यांनी रक्कम घेऊन उमेदवारांना पोलीस दलामध्ये भरती केले होते. मात्र एका पोलिसांनी मी तुम्हाला पैसे दिलेत मला का भरती करुन घेतले नाही, या कारणावरून पोलीस अधिकाऱ्यांची पितळ उघडे पडले. त्यानंतर नामदेव मिठ्ठेवाड यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

-Ads-

ही कारवाई हिंगोलीचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईदरम्यान पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस उपनिरीक्षक विनायक लंबे, संभाजी लेकुळे या कर्मचाऱ्यांनी नामदेव मिठ्ठेवाड यांना अटक केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)