मुंबई: तुम्हाला एखादी मुलगी पसंद आली तर सांगा तिला पळवून आणतो आणि तुम्हाला देतो, असे म्हणत भाजप आमदार राम कदम यांनी बेताल वक्तव्याची सीमाच पार केली. काल दहीहंडी निम्मित आयोजित कार्यक्रमात राम कदम बोलत होते.

दरम्यान, राम कदम यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, “घाटकोपर येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात भाजप आमदार राम कदम यांचा ‘रावणी’ चेहरा समोर आला आहे. हा राम नाही तर रावण कदम आहे. त्यांचे वक्तव्य हा महिलांचा अपमान आहे. राम कदम यांनी तात्काळ माफी मागावी”

काय म्हणाले आमदार राम कदम ?

मला कोणत्याही कामासाठी भेटू शकता, साहेब मी एका मुलीला प्रपोज केला. ती मला नाही म्हणते. प्लिझ मदत करा! तर शंभर टक्के मदत करेल. आधी मी म्हणेल तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या, जर आई वडील म्हणाले मुलगी पसंद आहे. तर मी तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)