हा यूपीएच्या “आधार’चा विजय – अभिषेक सिंघवी

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना विद्यमान केंद्र सरकारचे 90 टक्के दावे फेटाळले असून हा मोदी सरकारला मोठा झटका आहे. तत्कालीन यूपीए सरकारने योग्यरितीने तयार केलेले आधार विधेयक मोदी सरकारने संपुष्टात आणले होते.

-Ads-

मोदी सरकारने त्यात अनेक बदल केले होते. न्यायालयाने ते सर्व फेटाळले आहेत. हा तत्कालीन यूपीए सरकारने बनवलेल्या आधार विधेयकाचा विजय असून एनडीएचा पराभव आहे, असे ट्विट अभिषेक सिंघवी यांनी केले आहे.

सिंघवी म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने यूपीएने तयार केलेले एक चांगले आधार विधेयक पूर्णपणे संपुष्टात आणले होते. एक चांगली संकल्पना कशी संपुष्टात आणावी हे भाजपाकडून शिकावे. आधारमुळे होणारे फायदे नाकारता येऊ शकत नाहीत.

आता आधार बॅंक खाते, यूजीसी, मोबाइल कनेक्‍शन, सीबीएसईसाठी आवश्‍यक नाही. त्याचबरोबर खासगी कंपन्याही आधारची मागणी करु शकत नाहीत, असे सिंघवी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)