‘हा’ मराठी क्रिकेटपटू सांभाळणार राजस्थान रॉयल्सची धुरा

जयपूर : आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद स्टीव्ह स्मिथ याच्याकडून काढण्यात आले आहे. आता ही धुरा भारताचा सलामीवीर आणि मराठमोळा अजिंक्य रहाणे सांभाळणार आहे. बॉल छेडछाडप्रकरणी ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद गमावल्यानंतर स्टीव्ह स्मिथ याला आणखी एक मोठा झटका मानला जात आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात कॅमेरून बॅनक्रॉफ्टने बॉल कुरतडला होता. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. स्मिथनेही या बाबीला दुजोरा दिला. ऑस्ट्रेलियाने या प्रकरणाची दखल घेत स्स्मिथची कर्णधारपदावरून हकालपट्टी केली. तर डेव्हिड वॉर्नरने उपकर्णधारपदाचा राजीनामा दिला. सोबत स्मिथवर एक कसोटीच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली असून त्याच्या मानधनातून १०० टक्के कपातही करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)