‘हा’ दिग्गज नेता करणार पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश !

अहमदाबाद (गुजरात): गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात करणार आहेत.   वाघेला हे 29 जानेवारी रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे राष्टृवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

शंकरसिंह वाघेला गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वीचे कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडले होते. आरएसएसाअनिओ जनसंघातून राजकारणाला सुरुवात केलेले शंकरसिंह वाघेला दोन दशके कॉंग्रेस पक्षात होते. केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते अशी पदे भूषवलेल्या वाघेला यांना गुजरात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवले गेले नसल्याने त्यांनी कॉंग्रेसशी नाते तोडून जनविकल्प मोर्चाची बांधणी केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, गुजरातचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल उर्फ बोस्की म्हणाले, गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला हे शरद पवार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. वाघेला हे अनुभवी नेता असून ते राज्य आणि देशाची नस ओळखतात. त्यामुळे राज्यात पक्षाला ताकद मिळणार आहे. मी पक्षात त्यांचे स्वागत करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)