सलमान खान याच्या आगामी ‘भारत’ चित्रपटाच्या चित्रीकरणाची नुकतीच सुरुवात झाली आहे. तरीदेखील या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये  कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मुख्य आकर्षण अर्थातच भाईजान सलमान खान आहे. त्याच्यासोबत पुन्हा कतरीना कैफ असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

प्रियंका चोप्रा या चित्रपटात अगोदर काम करणार होती. परंत, तिच्या काही खाजगी कारणांमुळे तिने हा चित्रपट सोडला. त्यानंतर तिने साखरपुडा उरकून घेतला. प्रियांकासाठी हा चित्रपट खूप महत्वाचा होता. कारण याद्वारे ती पुन्हा बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार होती. तिने चित्रपट सोडल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ट्विट करून त्या घटनेची माहिती दिली होती.

सलमानला प्रियांकाच्या चित्रपट सोडण्याच्या निर्णयाबद्दल एका खाजगी वृत्त समूहाने विचारले असता त्याने सांगितले,  हा निर्णय घेणे तिच्यासाठी खूप कठीण होते. तिला हा चित्रपट हवाच होता. त्यासाठी तिने दिग्दर्शकांशी सपंर्क तर साधलाच परंतु, अर्पिताला देखील हजारवेळा संपर्क केला होता. त्यानंतर तिने चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेणे खूप मोठी बाब आहे.

तिच्या साखरपुड्यासाठी आणि लग्नासाठी आम्ही चित्रीकरणाच्या तारखांमध्ये देखील बदल केला असता. परंतु, तिने चित्रपट सोडण्यासाठीचे मन बनविले होते. तिने चित्रपट सोडण्यामागे नेमके कारण माहिती नाही, असेही सलमान पुढे म्हणाला.

प्रियांका चोप्रा हॉलीवूडस्टार ख्रिस पॅटसोबत ‘कॉवबॉय -निंजा वाइकिंग’ चित्रपटात दिसू शकते. ख्रिस पॅट ‘गार्डीयन्स ऑफ गॅलेक्सी ‘, ‘ज्युरॅसिक वर्ल्ड’, ‘अव्हेंजर्स’ यासारख्या मोठ्या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)