‘हा’ अभिनेता म्हणतो, ‘मी फिल्म इंडस्ट्रीत एखाद्या एलियनप्रमाणे आहे’

आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेता डॅनी डेंगजोंगप्पा यांनी स्वतः बद्दल एक धक्कादायक विधान केले आहे. त्यांच्या मते, ‘बॉलिवूडमध्ये ते एखाद्या एलियनप्रमाणे आहेत. देशातील सर्वांत सुंदर सिक्किम या राज्यातून असलेल्या डॅनी यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळेच स्थान मिळविले. 

याविषयी डॅनी यांनी सांगितले की, ‘मी फिल्म इंडस्ट्रीत एखाद्या एलियनप्रमाणे आहे. कारण मी सिक्किममधून आलो आहे. चित्रपट क्षेत्रात असतानाही मी कधी फिल्मी व्यक्तीप्रमाणे राहिलो नाही. मी वेगळा राहून केवळ माझे काम करीत गेलो. डॅनी यांना सिक्किमबद्दल विशेष ओढ आहे. कारण जेव्हा ते चित्रपटांची शूटिंग करीत नसतात तेव्हा ते आपल्या फार्महाउसमध्ये वेळ व्यतित करणे पसंत करतात. याविषयी त्यांनी सांगितले की, ‘एकाच पद्धतीचे काम करणे मला त्रासदायक वाटते. त्यामुळे कामात विविधता यावी म्हणून मी, पेंटिंग, नक्षीकाम आणि गाणी लिहिणे व गाण्याचा प्रयत्न करीत असतो. मी कधीही कुठल्या प्रकारची योजना आखत नाही. जेव्हा मला असे वाटले की, आता अभिनय करू नये तेव्हा मी अशाप्रकारचे काम करीत असतो.

ते हिंदी चित्रपटांमध्ये १९७१ पासून सक्रिय आहेत. वयाच्या ७०व्या वर्षीही ते चित्रपटांमध्ये आपली अदाकारी दाखवित आहेत. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांची कथा असलेल्या ‘काबुलीवाला’वर आधारित असलेला डॅनी यांचा ‘बायस्कोपवाला’ या चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ते मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)