हाॅटेलमध्ये जुगार खेळणारे पोलिसांच्या ताब्यात

सातारा,प्रतिनिधी

राधिका रस्त्यावरील एका नामांकित हॉटेलमध्ये जुगार खेळणार्‍या सातजणांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोकडसह मोबाईलही पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई रविवारी दुपारी तीनच्या सुमारास शाहूपुरी पोलिसांनी केली.

राधिका रस्त्यावरील प्रसिद्ध हॉटेलच्या लाॅजची एक खोली भाड्याने घेवुन काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तत्काळ शाहूपुरी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते.

त्यानुसार पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी एक पथक तत्काळ संबंधीत हॉटेलमध्ये पाठविले. यावेळी तेथे सातजण जुगार खेळताना सापडले. तसेच त्यांच्याजवळ काही रोकडही सापडली. नामांकित हॉटेलमध्येच हा प्रकार उघडकीस आल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी जुगार खेळणार्‍या सातजणांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात आणले.

या ठिकाणी प्रत्येकाची चौकशी करण्यात येत होती. त्यांच्याजवळ नेमकी किती रोकड सापडली, हे अद्याप समोर आले नाही. शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.

मोठ्या रकमेची शक्यता
दुपारी तीन वाजता छापा टाकल्यानंतरही रात्री दहा वाजेपर्यंत गुन्हा नोद न झाल्याने या कारवाईत पोलिसांनी मोठी रक्कम जप्त केल्याचे बोलले जाते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)