हास्य व संगीतमय कार्यक्रम जल्लोषला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

लोणावळा- भोंडे हायस्कूल येथे वसंत व्याख्यान माला समिती आयोजित हास्य व संगीतमय कार्यक्रम जल्लोषला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
विनोदी अभिनेते कुशल बद्रिके आणि अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या जल्लोष मधील हास्याचे फवारे उडवून देणाऱ्या अदाकारीने लोणावळेकर प्रेक्षक हास्यरंगात अगदी रंगून गेले होते. गायक जितेंद्र अभ्यंकर आणि स्वरदा गोडबोले यांच्या सुश्राव्य आणि सुरेल मराठी गीतांनी प्रेक्षक वर्ग अक्षरशः भारावून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, तळेगावचे माजी उप नगराध्यक्ष सुनील शेळके, आजी-माजी नगरसेवक, मान्यवर व नागरीक यावेळी उपस्थित होते.
वसंत व्याख्यान माला समिती अध्यक्षा राधिका भोंडे यांनी प्रास्ताविक केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)