हाशिमपुरा हत्याकांड; 16 निवृत्त पोलिसांना जन्मठेप 

नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी 1987 मधील खळबळजनक हाशिमपुरा हत्याकांड प्रकरणी 16 निवृत्त पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. उत्तरप्रदेशच्या मेरठमधील हाशीमपुरात घडलेल्या त्या घटनेत अल्पसंख्याक समाजातील 42 जणांची हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणात शिक्षा झालेले निवृत्त पोलीस प्रोव्हिन्शिअल आर्मड्‌ कॉर्न्स्टब्युलरीचे (पीएसी) सदस्य होते. पुराव्याअभावी ओळख न पटल्याने संशयाचा फायदा देत त्यांची विशेष न्यायालयाने मार्च 2015 मध्ये मुक्तता केली. मात्र, उच्च न्यायालयाने तो निर्णय फिरवला. या खटल्यात 17 जणांविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, पुराव्याशी छेडछाड हे आरोप निश्‍चित करण्यात आले होते. त्यातील एकाचे विशेष न्यायालयातील सुनावणीदरम्यान निधन झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, जन्मठेप सुनावताना उच्च न्यायालयाने हत्याकांडाचा उल्लेख पोलिसांनी नि:शस्त्र लोकांची केलेली जाणुनबुजून हत्या असा केला. न्यायालयाने सर्व दोषींना 22 नोव्हेंबरपर्यंत आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला आहे. मे 1987 मध्ये पीएसीच्या पोलिसांनी सुमारे 50 जणांना ताब्यात घेतले. त्यातील बहुतांश जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील 42 जणांचे मृतदेह नंतर एका कालव्यात फेकून दिलेले आढळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)