हालचालीं अभावी विविध रोग 

डॉ. शितल जोशी 
व्यायाम, योगासने किंवा कोणत्याही स्वरूपात शारीरिक हालचाली न केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि ह्या वाढलेल्या साखरेवर नियंत्रण राहात नसल्यामुळे मधुमेह आणि हृदयविकार निर्माण होतात, असे नवीन संशोधनात आढळले आहे.
आधुनिक जीवनशैलीत बैठे काम करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. अशा व्यक्तींना फक्त बौद्धिक श्रम करावे लागतात. मात्र, शारीरिक श्रमांअभावी अशा व्यक्तींच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते. त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये मधुमेह आणि हृदयविकार होण्याची शक्‍यताही मोठ्या प्रमाणावर बळावते, असेही अमेरिकेतील मिसुरी विद्यापीठातील केलेल्या संशोधनात आढळले आहे. आधीच्या संशोधनात कमी हालचाल करणाऱ्या व्यक्तींना हृदयविकार आणि मधुमेह टाईप-2 होण्याची शक्‍यता जास्त असते, असे आढळले होते. मात्र, त्यामागील कारणे माहीत नव्हती.
संशोधकांनी दैनंदिन व्यवहारात अनेक प्रकारच्या शारीरिक हालचाली करणाऱ्या एका चमूला कमीत कमी हालचाली करण्यास सांगण्यात आले. हालचालींची संख्या नेहमीपेक्षा अर्ध्यावर आणण्यात आली. मात्र, खाण्याचे प्रमाण सर्वसाधारणच ठेवण्यात आले. हालचालींची संख्या कमी केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवता येत नाही. त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकार जडतो, हे सिद्ध करण्यासाठी संशोधकांनी रोजच्या व्यवहारात शारीरिक हालचाली करणाऱ्या व्यक्तींना कमीत कमी हालचाली करण्याची सूचना केली.
दोन भागांमध्ये या चमूतील व्यक्तींच्या रक्तातील साखरेचे प्रमाण मोजण्यात आले. पहिल्या भागात तीन दिवस त्यांना हालचाली तसेच व्यायाम करण्याची मुभा देण्यात आली तर नंतरच्या तीन दिवसांत हालचाली किंवा व्यायामासाठी फक्त तीन मिनिटे इतका अल्प कालावधी देण्यात आला. दरम्यान, रक्तातील साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी त्यांना उपकरणेही देण्यात आली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)