हार्वेस्टर मशीनमध्ये करंट उतरल्याने तरुणाचा मृत्यू

मंचर- लातूर येथे ऊस तोडणीसाठी असलेल्या हार्वेस्टर मशीनमध्ये विद्युत वाहक तारांचा प्रवाह उतरल्याने आंबेगाव तालुक्‍यातील जवळे येथील राकेश कैलास लायगुडे (वय 27) यांचा शॉक बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 3) घडली. या दुर्घटनेमुळे जवळे गावावर शोककळा पसरली आहे.
राकेश लायगुडे हा चुलत भाऊ प्रदीप लायगुडे आणि चुलते दिलीप लायगुडे यांच्या बरोबर हार्वेस्टरद्वारे ऊस काढणीचा व्यवसाय करीत होते. त्यांचे गेल्या अनेक दिवसांपासून लातूर येथे ऊस काढणीचे काम सुरू होते. रविवारी ऊस कापणारे हार्वेस्टर मशीन कापलेला ऊस टॉलीमध्ये भरीत होते. त्यावेळी राकेश हा हार्वेस्टरच्या मागे उभा राहून डायव्हरला मशीन मागे घेण्यासाठी सांगत होता. हार्वेस्टरच्या वरुन गेलेल्या विद्युतवाहक तारा हार्वेस्टर मशीनच्या वरच्या बाजूला गुंतल्याने वीजप्रवाह मशीनमध्ये उतरला. त्यावेळी टॉलीला हात लावून उभा असलेल्या राकेशला वीजेचा जोरदार शॉक बसला. त्यानंतर वैद्यकीय उपचारासाठी त्याला तात्काळ स्थानिक दवाखान्यात हलवले असता डॉक्‍टरांनी मृत झाला असल्याचे सांगितले. शेतकरी कैलास लायगुडे यांचा राकेश हा एकुलता मुलगा असल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)