हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

रविंद्र जडेजाची पांड्याच्या जागी निवड

नवी दिल्ली – भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेतून मुकावे लागणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला मालिकेत खेळता येणार नाही. त्याच्या जागी रवींद्र जाडेजाला टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठीच्या संघात स्थान देण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर दीर्घकाळ तो दुखापतीमुळे संघा बाहेर होता. तर, पुनरागमन करण्याची संधी मिळाल्यानंतर “कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्याच्यावर आणि लोकेश राहुलवर बंदी घालण्यात आली होती.

यानंतर त्याला न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतून पुनरागमनाची संधी मिळाले होती. त्या मालिकेत पुनरागमनानंतर आपल्या कामगिरीने त्याने पुन्हा प्रभावीत करताना विश्‍वचषकासाठीच्या संभाव्य संघात आपले स्थान पक्‍के केले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार होते. मात्र, पाठीच्या दुखण्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतात होणाऱ्या या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.

हार्दिकच्या दुखापतीमुळे त्याच्या जागी आता अष्टपैलू फिरकी गोलंदाज रविंद्रत जडेजाला अंतिम संघात स्थान देण्यात आले आहे. आता जडेजाकडे संघ व्यवस्थापनाला प्रभावीत करुन विश्‍वचषकासाठीच्या संभाव्या संघात जागा मिळवण्याची अखेरची संधी असणार आहे.

जडेजाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय मालिकेत व दोन कसोटी सामन्यांत जडेजाला संधी देण्यात आली होती. मात्र, त्याला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याला केवळ दोन बळी मिळवता आले होते. तर त्याने यावेळी केवळ 8 धावा केल्या. कसोटी मालिकेत मात्र त्याने दोन सामन्यांत 7 बळी मिळवत प्रभावी कामगिरी केली होती. मात्र, आता विश्‍वचषकासाठी संघात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने त्याच्याकडे अखेरची संधी असणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला टी-20 सामन्याने 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन सामने अनुक्रमे विशाखापट्टणम आणि बंगळुरु येथे होतील. तर, पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका 2 मार्चपासून सुरु होईल आणि पहिला सामना हैदराबाद येथे होईल. त्यानंतर नागपूर (5 मार्च), रांची (8 मार्च), मोहाली (10 मार्च) आणि दिल्ली (13 मार्च) असे सामने होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)