हार्दिक पांड्याचे बिग बॉसमध्ये झळकलेल्या ‘या’ स्वीडिश-ग्रीक अभिनेत्रीशी डेटिंग

हार्दिक पांड्या सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आणि एली अवराम सुद्धा दक्षिण आफ्रिकेला फेरफटका मारण्यासाठी गेली आहे. स्वीडिश-ग्रीक अभिनेत्री एलीने मिकी व्हायरस, किस किसको प्यार करु, नाम शबाना यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे. हार्दिकचा भाऊ, क्रिकेटपटू कृणाल पांड्याच्या लग्नात एलीने उपस्थिती लावली होती, तेव्हाच दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. शिखर धवनची बायको आयेशाने त्यांची मुलगी रियाच्या 13 व्या वाढदिवसाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दौऱ्यावर असलेल्या क्रिकेटपटूंच्या बेटर हाफ (वॅग्स- वाईफ अँड गर्लफ्रेण्ड्स) दिसत आहेत.

रोहितची पत्नी रितीका, भुवीची पत्नी नुपूर, अश्विनची पत्नी प्रिती, उमेशची पत्नी तान्या, राहाणेची पत्नी राधिका यांच्यासोबत एलीसुद्धा हजर आहे. शर्मिला टागोर – मन्सूर अली खान पतौडी यांच्यापासून अलिकडे हरभजन – गीता, युवराज-हेझल, झहीर-सागरीका आणि विराट-अनुष्का अशी क्रिकेट-बॉलिवूड अफेअरची उदाहरणं आहेत. यातच हार्दिक-एलीचं नाव जोडलं जावं, अशी चाहत्यांची इच्छा आहे. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्याही स्वीडिश-ग्रीक अभिनेत्री एली अवरामच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा आहेत.

-Ads-

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
15 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)