अहमदाबाद: पटेल समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसलेले या समाजाचे नेते हार्दिक पटेल यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु आज त्यांना तेथून घरी जाण्यास अनुमती देण्यात आली आहे. तथापी ते आपल्या निवासस्थानी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. त्यांच्या उपोषणाचा आजचा सोळावा दिवस होता.

माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्यांना तेथे जाण्यास मज्जाव केला. त्याला माध्यम प्रतिनिधींनी विरोध केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केल्याचीही घटना आज घडल्याने तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान शेतकऱ्यांची कर्ज माफी आणि पाटीदार समाजाला आरक्षण या मागण्या मान्य होईपर्यंत आपले उपोषण सुरूच राहील असे हार्दिक पटेल यांनी फेसबुक लाईव्ह वरून आपल्या समर्थकांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)