हार्दिक पटेल यांच्या उपोषणाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

अहमदाबाद – पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी तरूण नेते हार्दिक पटेल यांनी 25 ऑगस्टपासून उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पाठिंबा दर्शवला आहे. त्यासाठी हार्दिक यांची राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुजरातमधील भाजप सरकारने आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने हार्दिक यांनी आता उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. त्यांना कॉंग्रेस, राजद, तृणमूल कॉंग्रेस या पक्षांनी आधीच पाठिंबा दिला आहे.

सार्वजनिक ठिकाणांचा वापर करण्याची परवानगी अधिकाऱ्यांनी नाकारल्याने हार्दिक यांनी त्यांच्या येथील फार्महाऊसवरच उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, उपोषणाच्या चार दिवसांच्या कालावधीत हार्दिक यांचे वजन एक किलोने घटल्याची माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)