हार्दिक पटेलला घेतले ताब्यात

अहमदाबाद – आरक्षणाच्या मागणीसाठी अहमदाबादच्या निकोल भागात लाक्षणिक उपोषण करण्याचा प्रयत्न करणारे पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरक्षणाच्या मागणीसाठी पटेल समाजाने 25 ऑगस्ट रोजी मोठे आंदोलन आयोजित केले आहे त्यासाठी जागेला अनुमती द्यावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज हे लाक्षणिक उपोषण तेथे केले जाणार होते. पण त्याला प्रारंभ करण्यापुर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 25 ऑगस्ट पासून आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा हार्दिक पटेल यांनी दिला आहे.

त्यांना प्रतिबंधात्मक आदेश जारी असताना बेकायदेशीर जमाव जमवल्याच्या कारणावरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी ज्या ठिकाणी लाक्षणिक उपोषणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्या कार्यक्रमाला त्यांना अनुमती देण्यात आलेली नव्हती असे पोलिसांचे म्हणणे आहे. हार्दिक पटेल यांना ताब्यात घेतल्याचे समजताच क्राईम ब्रॅंचच्या कार्यालयाबाहेर त्यांचे अनेक समर्थक जमले त्यांनी तेथे घोषणाबाजी सुरू केल्यामुळे तेथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

-Ads-

पटेल आरक्षणाच्या मागणीसाठी हार्दिक पटेल यांनी 25 ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण आंदोलनाची घोषणा केली असली तरी राज्य सरकारने त्यांना आज अजून त्यासाठी कोणत्याही जागेची अनुमती दिलेली नाही. मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी यात हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी त्यांना पत्र पाठवून केली आहे पण अजून मुख्यमंत्र्यांनीही त्यांना तशी अनुमती दिलेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)